Responsive Ads Here

Friday, 7 July 2017

मुंब्र्यातील अनेक प्रलंबीत प्रश्नांबाबत ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. संजीव जयस्वाल यांची भेट घेतली.या भेटीमध्ये मुंब्र्यातील विविध प्रश्नांबाबत गांभीर्याने चर्चा झाली. *त्यामध्ये प्रमुख मागण्या ह्या खालीलप्रमाणे…*.......मुंब्र्यातील अनेक प्रलंबीत
प्रश्नांबाबत ठाणे
महानगरपालिकेचे
आयुक्त श्री. संजीव जयस्वाल
यांची भेट घेतली.या भेटीमध्ये मुंब्र्यातील विविध प्रश्नांबाबत गांभीर्याने चर्चा झाली.

*त्यामध्ये प्रमुख मागण्या ह्या खालीलप्रमाणे…*.......

*भारत गिअर ते खर्डी पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे.*

*अलमास कॉलनी ते आयडीयल मार्केटचा रस्ता पूर्ण करणे.*

*पोलीस स्टेशन समोरील जागेमध्ये सर्व शासकीय  कार्यालये एकाच इमारतीमध्ये आणण्याबाबत अंतीम  मंजूरी मिळवणे.*

*Water Modeling Scheme ची अंमलबजावणी करणे अंदाजे एकूण खर्च रुपये 125 कोटी.*

*मुंब्रा परिसरातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे.*

*मुंब्रा स्टेशन जवळील गार्डन प्लॉट, घासवाला कंपाऊंड येथील गार्डन प्लॉट डेव्हलपमेंट करणे.*

*शहरातील प्रमुख ६ नाले चर्नीपाडा, इंशा नगर, शिवाजी नगर, कादर पॅलेस हे सर्व नाले तसेच चांद नगर व संतोष नगर येथील नाल्यांचे रुंदीकरण करणे व दुरुस्तीकरण करणे.*

ही सर्व कामे लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. संजीव जयस्वाल यांनी दिले. या बैठकीला महानगरपालिका प्रशासनामधील सर्व विभागातील अधिकारी, नगरसेवक शानू पठाण, नगरसेविका आशरीन राऊत, नागरसेवक ज़फर नोमानी, राजू अन्सारी, हे उपस्थित होते.

तसेच शहरातील साफसफाई नियमीत होण्यासाठी पुढील महिन्यामध्ये शहरामध्ये स्पेशल ड्राईव्ह म्हणून परिसरातील ५०० ठिकाणी १०००
कर्मचा-यांमार्फत ७ दिवस प्रायोजिक तत्वावर साफ सफाई अभियान राबविण्यात येणार असून यामध्ये परिसरातील गटारे व इमारतींमधील कचरा यांची साफ सफाई करण्यात येणार आहे.

*- डॉ. जितेंद्र आव्हाड*

No comments:

Post a Comment